नाशिक – देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय.
एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसरीकडे या इंजेक्शनचा काळाबाजार देखील सुरु आहे. रेमडेसिविर इंजेक्शन 25 हजार रुपयांना काळाबाजारात विकताना एका डॉक्टरला नाशिक पोलीसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतलं. रुग्णाच्या नातेवाईकांनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली; त्यामुळे पंचवटीतील अमृतधाम या परिसरात रात्री उशिरा या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडे तीन इंजेक्शन्स आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे. रेमडेसिवीर औषधाची गरज असणाऱ्या नागरिकांनी 020-26123371 अथवा टोलफ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही कंट्रोलरूम ३१ मे पर्यंत कार्यरत राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- नंदुरबारमध्ये बिकट परिस्थिती, बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण गुजरातच्या वाटेवर
- कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की
- पहिल्याच सामन्यात युनिवर्सल बॉस गेलचा विक्रम; आयपीएलमधील पहिलाच खेळाडू
- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा यांची नियुक्ती
- रेमेडेसिवीर ‘व्हेंटिलेटर’ वर! इंजेक्शनचा साठा उपलब्ध राहील, असे नियोजन करा: पालकमंत्री टोपे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

