जालना: राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा स्फोट होत आहे, वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमेडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाल्यामुळे तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आढावा बैठक घेत जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तसेच ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध राहील, या दृष्टीने नियोजन करण्याबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.
रेमेडिसेविर इंजेक्शन्सचा पुरेशा प्रमाणात जिल्ह्यात साठा उपलब्ध राहील यासाठी याची पुरेशी मागणी नोंदविण्यात यावी. जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या प्रत्येक इंजेक्शनचा हिशेब ठेवण्यात यावा तसेच जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पालकमंत्री म्हणाले की, पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्ती उशिराने रुग्णालयात भरती होत असल्याने त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांची प्रकृती खालावत असुन अनेकप्रसंगी रुग्णांचा मृत्यूही होत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. सर्वसामान्य नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारखी कोरोनाची लक्षणे असतानाही याकडे दुर्लक्ष करू नये, त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी.
महत्वाच्या बातम्या
- थरारक सामन्यात पंजाबच ठरला किंग; सॅमसनची झुंजार खेळी व्यर्थ
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयचे समन्स, १४ एप्रिलला होणार चौकशी
- पैठणच्या शेतकऱ्याचा माल थेट दिल्लीत
- १५ एप्रिल ते २५ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावल्यास जनतेचे समर्थन : चंद्रकांत खैरे
- सिटीस्कॅन केंद्रानी स्थानिक प्रशासनाला माहिती देणे बंधनकारक : जिल्हाधिकारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

