Share

कोणी बेड देता का बेड! उस्मानाबादेत कोरोना रुग्ण बेहाल, जमिनीवरच उपचाराची नामुष्की

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत आहे, त्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. प्रशासनाने केलेले उपाय योजना सुद्धा तोकड्या पडत आहेत. दुसरीकडे रेमडेसिविर, ऑक्सिजनसह अनेक बाबींची टंचाई निर्माण होत आहे. सोमवारी जिल्हा कोविड रुग्णालयासह शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व खासगी रुग्णालयातील कोरेाना रुग्णांसाठीचे बेड संपले असून, परिस्थिती आवाक्याबाहेर जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आले.सायंकाळी जिल्हा कोविड रूग्णालय फुल्ल झाले होते. परिणामी रुग्णांवर जमिनीवर उपचार करण्यात आले.

खासगी रुग्णालयात सायंकाळपर्यंत केवळ २८ बेड रिकामे होते. मात्र प्रथमच सर्वाधिक ६८० इतक्या विक्रमी संख्येने नवे रुग्ण आढळल्याने या रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले. या पार्श्वभूमीवर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांनी घरीच उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.सोमवारी ६८० इतक्या विक्रमी संख्येने नव्या रुग्णांची भर पडली आहे.

त्यापैकी गंभीर रुग्णांवर उपचार कुठे आणि कसे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर उपस्थित झाला आहे. कारण उस्मानाबाद जिल्हा कोविड रूग्णालय दोन दिवसांपासून फुल्ल होण्याच्या मार्गावर होते.सोमवारी सायंकाळपर्यंत रुग्णांना जमिनीवर झोपवून उपचार सुरू करण्यात आले होेते. खरेतर जिल्हा रूग्णालयातील आरोग्य यंत्रणेने अत्यंत अडचणीच्या काळातही गंभीर स्वरूपाच्या रूग्णांवर तातडीने उपचार देण्यास सुरूवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!