नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव बघता जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले आहे. पण या लॉकडाऊन मध्ये प्रशासनाने काही व्यवसाय सुरु करण्याची परवानगी दिल्यामुळे जिल्ह्यातील इतर व्यापाऱ्यांनी आम्हाला पण परवानगी द्या अशी मागणी करत. प्रशासनाविरोधी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे येत्या काळात प्रशासन आणि व्यापाऱ्यात संघर्ष वाढू शकतो.
१ मार्च ते ७ मार्च पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केल्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य केले. या संचारबंदी नंतर जिल्ह्यातील व्यापार आता पूर्व पदावर आणण्यासाठी प्रशासन व्यापाऱ्यांना मदत करेल अशी अपेक्षा होती. पण या उलट संचारबंदी संपल्यानंतर प्रशासनाने काही मोजक्याच दुकानांना उघडण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांनी सुद्धा आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे. ७ मार्चला व्यापाऱ्यांकडून घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्याना पत्र पाठवण्याचे ठरवण्यात आले. मुख्यमंत्र्यांकडे विनंती करून लवकरात लवकर काही निर्णय व्हायला हवा अशी मागणी सध्या व्यापारी करत आहेत.
मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. या आर्थिक फटक्यातून बाहेर येणाच्या प्रयत्नात असलेला व्यापारी आता पुन्हा संकटाच्या छायेत अडकला आहे. जर पुन्हा व्यापाऱ्यांची दुकाने बंद ठेवण्यात आली तर जिल्ह्याचे अर्थचक्र होईल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
- अविश्वसनीय! तुमच्या ‘खास’ व्यक्तीला चंद्राची सफर घडवा, ते ही मोफत!
- ‘त्या’ निनावी फोनने वाचले दोघींचे आयुष्य
- ‘महाराष्ट्रधर्म, हिंदवीस्वराज्य प्रथम’ म्हणत वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा !
- बाळासाहेब थोरात घटनाबाह्यरितीने काम करत आहेत, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडून काढून घेऊन NIA कडे देण्याची एवढी घाई का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

