Share

अविश्वसनीय! तुमच्या ‘खास’ व्यक्तीला चंद्राची सफर घडवा, ते ही मोफत!

Published On: 

नवी दिल्ली : प्रेमात अनेक जण आपल्या त्या खास व्यक्तीला आश्वासने, वचने, कौतूक करताना तुला चंद्रावर नेईल, ताऱ्यांची सफर घडवील असे सांगतात. विशेष करून पुरूष स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी या प्रकारचे संवाद बोलतात. पण अद्यापर्यंत एकाही प्रेमीने हे धाडस केले नाही वा त्याला ते जमले नाही. मात्र, ही गोष्ट आता प्रत्यक्षात साकारू शकते. कारण जपानमधल्या एका उद्योगपती चंद्रावर जाणार आहे. तोही एकटा नव्हे तर अनेकांना सोबत घेऊन. यासाठी त्याने लोकांना आवाहन केले आहे की, या माझ्यासोबत. पण त्यासाठी एक मनोरंजक अट आहे की, तुम्हाला हा प्रवास फुकटात करायचा आहे. एकही पैसा न खर्च करता.

एलन मस्कची कंपनी स्पेस एक्स फ्लाइटमधून मोफत मून ट्रीप करणाऱ्या जपानी अब्जपती युसाकू मेजावाला आतापर्यंत ३ लाख अर्ज मिळाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर सर्वाधिक अर्ज पाठवणाऱ्या देशाची यादी टाकली. त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. मेजावाने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, ते ८ लोकांचा शोध घेत आहे. त्यांना ते मोफत चंद्रावर घेऊन जातील. यानंतर त्यांना २३७ देश आणि भागातून अर्ज मिळाले. भारतानंतर सर्वात जास्त अर्ज अमेरिका, जापान, फ्रान्स आणि ब्रिटनवरुन आलेत.

युसाकू हा म्युझिक बँड परफॉर्मर होता. सध्या तो जपानमधील उद्योगपती आहे. जगभरातील लोकांना त्याने चंद्रावरील सफरीला येण्याकरिता आवाहन केले आहे. डियर मून प्रोजेक्ट असे त्याच्या या चांद्रयान मोहिमेचे नाव आहे. या प्रवासाचे वैशिष्ट्य असे की, चंद्रावर सहलीसाठी ज्यांना जायचे आहे, त्यांना विनामूल्य या सहलीचा आनंद घेता येणार आहे.

या अवकाश सहलीला ज्यांना जायची इच्छा आहे त्यांना एक रुपयासुद्धा खर्च करण्याची गरज नाही. त्याने दिलेल्या या अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ऑफरकरिता चक्क ३ लाख लोकांनी अर्ज केले आहेत. जगभरातील लोकांना युसाकू यांनी चंद्रावरील प्रवासाचे आमंत्रण दिले आहे. युसाकू यांच्या स्पेस यानाला चंद्रावर जाण्यास तीन दिवस लागतात. त्यानंतर चंद्रावरील आजूबाजूचा परिसर फिरल्यानंतर त्यांचे यान पुन्हा पृथ्वीवर परत येईल. त्यांच्या डियर मून प्रोजेक्ट या मोहिमेची संपूर्ण जबाबदारी एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीने घेतली आहे.

१४ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
उद्योगपती युसाकू यांच्या डियर मून प्रोजेक्ट या मोहिमेअंतर्गत चंद्रावरील सफरीला जाण्याकरिता १४ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन युसाकू यांनी केले आहे. विविध क्षेत्रातील लोकांच्या सहभागामुळे या सहलीला एक वेगळेपण नक्कीच प्राप्त होईल असे त्यांचे म्हणणे आहे. २१ मार्च रोजी अर्ज तपासणी झाल्यानंतर अर्जदारांना मुलाखतीकरिता बोलावण्यात येईल. त्यानंतर पुढच्या वर्षी मे महिन्यात मुख्य मुलाखत आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर चंद्रावरील सहलीला जाण्याकरिता आठ लोकांची निवड केली जाईल, अशी माहिती युसाकू यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!