Share

‘महाराष्ट्रधर्म, हिंदवीस्वराज्य प्रथम’ म्हणत वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा !

Published On: 

🕒 1 min read

मुंबईः आज ९ मार्च म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापन दिन. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेनं आजचा वर्धापन दिनाचा सोहळा रद्द केलेला आहे. आजच्या मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. पहाटे ट्विट करुन राज ठाकरेंनी सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील माझ्या सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा. राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे. #मनसेवर्धापनदिन #महाराष्ट्रधर्म #हिंदवीस्वराज्य #महाराष्ट्रप्रथम #राजठाकरे #महाराष्ट्रसैनिक अशा टॅशचाही वापरही राज ठाकरे यांनी ट्विट मध्ये केला आहे.

राज ठाकरे यांनी ९ मार्च २००६ रोजी मनसे ची स्थापना केली. मनसेने २००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत लक्षणीय यश मिळाले. पुणे, मुंबई, नाशिक व ठाणे येथील एकूण १३ आमदार निवडून आले. मनसे’ ला तेवढ्याच म्हणजे आणखी तेरा जागांवर क्रमांक दोनची मते मिळाली होती. एकोणतीस जागांवर मनसे’ चे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. परंतु त्यानंतर मात्र मनसेला फार काही कमाल करता आली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!