Share

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडून काढून घेऊन NIA कडे देण्याची एवढी घाई का ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता, या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत.मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एटीएस करत आहे. मात्र हा तपास जर एनआयएकडे देण्याचा डाव असेल तर त्यात नक्कीच काही तरी काळंबेरं आहे. आम्हीही या प्रकरणाचा कसून तपास करून सर्व काही बाहेर काढू, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिला.

विरोधकांकडून ऊठसूठ महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. राज्यातील यंत्रणांवर अविश्वास दाखवला जात आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रात यंत्रणाच नाही. सर्व काही केंद्र सरकारच्याच हाती आहे असं जर विरोधकांना वाटत असेल तर त्यांनी इंधन दरवाढीचा विषयही केंद्राकडेच द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील या मुद्द्यावरून भाजपवर तोफ डागली आहे. ATS कडून तपास काढून घेऊन NIA कडे देण्याची मोदी सरकारची एवढी घाई कशाला? काही अडचणीचे उघड होईल भीती वाटते का? भीमा-कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिस चांगले तपास करत आहे म्हणणारी NIA सरकार बदलताच पुणे पोलिसांकडून तपास काढून घेते. सुशांत सिंह प्रकरणात CBI अजून गप्प आहे. काळंबेरं दिसते असे सावंत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!