पालघर : आदिवासींच्या जमिनीच्या हस्तांतरणावरून शिवसेनेचे पालघरमधील खासदार राजेंद्र गावित यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठा आरोप केला आहे. थोरात हे घटनाबाह्यरितीने काम करत आहे असा आरोप गावित यांनी केला आहे.
महाराष्ट्रात आदिवासी जमीन बंदी हस्तांतरणाचा कायदा आहे. पण तरीही राज्यात मुंबई, ठाणे, पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या जमिनीचे हस्तांतरण बिगर आदिवासींवर होत आहे. या सर्व गोष्टींना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात परवानगी देत आहे, असा आरोप गावित यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्र्यांनी तपासणी करुन योग्य ती करवाई करावी, अशी मागणी देखील गावित यांनी केली आहे. तसेच, मुंबई, ठाणे, पनवेल भागात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची जमिनींना मागणी वाढली आहे. महसूल मंत्री थोरात घटनाबाह्यरितीने काम करत असल्याचा आरोप गावित य्यानी केला आहे.
मात्वाच्या बातम्या
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडून काढून घेऊन NIA कडे देण्याची एवढी घाई का ?
- ‘लवकरच भारताला देखील नरेंद्र मोदींचे नाव देण्यात येईल’
- राज ठाकरे यांचा नाणार प्रकल्पाला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा दावा
- गँगस्टर गज्या मारणेच्या अडचणी वाढल्या; न्यायलयाने दिला दणका
- अग्गंबाई सासूबाई’चा निरोप घेताना ‘बबड्या’ झाला भावूक, म्हणाला “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

