औरंगाबाद : दक्ष नागरिकाच्या निनावी फोनची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन कारवाई केल्याने बिडकीनमध्ये दोन सख्ख्या बहिणींचे बालविवाह थांबवण्यात यंत्रणेला यश आले आहे. या दोन्ही मुलींना बालकल्याण समितीने पालकांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय त्यांचा विवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट आदेश यावेळी समितीने दिले.
बिडकीनमध्ये बालविवाह होणार असल्याची माहिती चाइल्ड लाइन आणि बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात महिला बालकल्याण विभाग व पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने पैठण तालुक्यातील बिडकीन येथील दोन व औरंगाबाद तालुक्यातील लासुर स्टेशन दोन असे एकूण चार विवाह रोखण्यात यश आले होते. या घटनेतील मुलींचे वय हे अवघे ९, १०, ११ व १३ वर्ष होते. बिडकीन येथील मुली शेवगाव तालुक्यातील तर लासुर स्टेशन येथील मुली नेवासा फाटा भागातील आहेत. या बालविवाहाची माहिती अॅड. गवांदे यांना मिळाली होती.
बालविवाह कायद्याविषयी आम्हाला माहिती नाही : पालक
‘आमच्या समाजात मुलींचे लवकर लग्न लावण्याची रीत आम्ही पाळतो. बालविवाह कायद्याविषयी आम्हाला माहिती नाही, असे या पालकांचे म्हणणे होते. त्यावर बिडकीन पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रशांत मुंडे यांच्यासह चाइल्डलाइनचे यशवंत इंगोले, आम्रपाली बोर्डे, बालसंरक्षण कक्षाच्या संरक्षण अधिकारी कल्पना मोहिते व इतर अधिकाऱ्यांनी हा बालविवाह थांबवत मुलींना बालकल्याण समिती समक्ष नेले. यावेळी समितीने पालकांचे समुपदेशन केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रधर्म, हिंदवीस्वराज्य प्रथम’ म्हणत वर्धापन दिनी राज ठाकरेंच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा !
- बाळासाहेब थोरात घटनाबाह्यरितीने काम करत आहेत, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास ATS कडून काढून घेऊन NIA कडे देण्याची एवढी घाई का ?
- ‘लवकरच भारताला देखील नरेंद्र मोदींचे नाव देण्यात येईल’
- राज ठाकरे यांचा नाणार प्रकल्पाला शरद पवारांचा पाठिंबा असल्याचा दावा


