Share

‘कोरोना काळात खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली’

Published On: 

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत होती त्यामुळे आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी आपल्याला पाहायला मिळाले होते.

परंतु मागील काही दिवसांपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आणि वाढलेल्या लसीकरणामुळे सध्या तरी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. अशा सर्व भीषण परिस्थितीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली गेली. कोरोना संकटाच्या काळात राजेश टोपे यांच्या आई गंभीर आजारी होत्या. अशावेळी आईच्या आरोग्याची काळजी घेत टोपे सातत्यानं कामात व्यस्त होते. याच दरम्यान त्यांच्या आईचा मृत्यू झाला.

मात्र, खचून न जाता टोपे यांनी आपली भूमिका सार्थपणे निभावली आहे. टोपे यांच्या कामाचं कौतुक विरोधी पक्षातील नेत्यांनीही केलं आहे. त्याचबरोबर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही टोपे यांना चांगल्या कामाचं प्रशस्तीपत्र दिलं आहे. राजेश टोपे हे डॉक्टर नाही ते इंजिनिअर आहेत. टोपे यांना कोणतीही जबाबदारी दिली तरी ते चांगलं काम करतात. मात्र, कोरोनाच्या काळात टोपे यांनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे. अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी टोपे यांचं कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!