औरंगाबाद : शिवसेना नेते राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार हरिभाऊ बागडे यांनी शनिवारी राजकीय मतभेद दूर सारत चाय पे चर्चा केली. यावेळी चहासोबत गप्पांचा चांगलाच फड रंगला होता. सत्तेत विरोधात असतांनाही सोबत झालेल्या या चहापानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दरेकर यांनी सर्व दावे फेटाळत यावेळी कुठलीही राजकीय चर्चा न करता केवळ जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचे सांगितले.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी होण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर शनिवारी शहरात दाखल झाले होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या समवेत दरेकर यांच्या वाहनांचा ताफा यात्रेत सहभागी होण्यासाठी जात होता. नेमके त्याच वेळी भालगाव फाटा येथे शिवसेना नेते राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे कार्यकर्त्यांसह मतदार संघातील कामानिमित्ताने आले होते. यावेळी भुमरे यांनी दरेकर यांच्या वाहनांचा ताफा बघितला.
त्यानंतर त्यांनी दरेकर यांना संपर्क केला. दरेकर यांच्या वाहनांचा ताफा लगेच माघारी परतला. त्यानंतर तेथील एका चहा टपरीवर भुमरे, दरेकर, बागडे या त्रिकुटांच्या गप्पांचा फड चांगलाच रंगला होता. भुमरे, दरेकर, बागडे यांनी चहाचा आस्वाद घेत राजकारण बाजूला ठेवले. काही मिनिटे दिलखुलास गप्पा मारल्या. चर्चा झाल्यानंतर दरेकर यात्रेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. दरम्यान यासंदर्भात दरेकर म्हणाले भुमरे यांच्यासोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचा मतदार संघातून जात असताना त्यांनी फोन केला. त्यामुळे चहा घेत आम्ही काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. मात्र सध्या कट्टर विरोधक असलेल्या शिवसेना-भाजप नेत्यांचे हे चहापान सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रत्येक दडपशाहीचा पराभव होतो’, मालविंदर सिंग पुन्हा अडकले वादाच्या भोवऱ्यात
- सराफा बाजार बंद! व्यापाऱ्यांनी केला हॉलमार्कला विरोध
- आता आश्वासन नव्हे तर वचनपूर्ती, आमदार अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास!
- ‘भाजप समोर महाविकास आघाडी भुईसपाट होईल’; चंद्रकांत पाटलांच भाकीत
- निमित्त दहीहंडीचे! भाजप आणि महाविकास आघाडीचा संघर्ष कोणत्या ‘थरा’ला जाणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

