Share

सराफा बाजार बंद! व्यापाऱ्यांनी केला हॉलमार्कला विरोध

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकारने आता सोन्यावर हॉलमार्किंगची सक्ती केली आहे. त्यामुळे दागिन्यांवरील कॅरेटचा मार्क न देता दागिन्यांवर हॉलमार्क दि. १६ पासून अनिवार्य केले आहे. त्याच्या जाचक अटीविरोधात महाराष्ट्र सुवर्णकार संघटनेने सोमवारी दुकाना बंद ठेवत हॉलमार्क विरोधात निषेध व्यक्त केला. त्यामुळे शहरातील सराफा बाजारपेठ पूर्णपणे बंद होती.

हॉलमार्किंग एचक्यूआयडी कायद्याअंतर्गत सोन्याच्या वस्तूंना दि. १६ पासून हॉलमार्क असणे गरजेचे म्हणत केंद्र सरकारने याबाबत सक्ती केली आहे. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होऊन वेळ हि खर्च होत आहे. त्यात असलेल्या जाचक अटीमुळे व्यवसायावर मोठ्याप्रमाणात परिणाम होत असून भारतीय मानक ब्युरोने सोन्याच्या वस्तूवरील शुद्धतेच्या चार प्रमाणित शिक्क्यावर अचानक बदल केले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सतत बदलत्या अटी आणि नियमांमुळे व्यवसायावर परिणाम होत असून कोरोना काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असलेयाचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले. तत त्यात असे अचानक बदलेले प्रमाणित शिक्क्यांचे बदल, त्यात ग्राहकांचा होणारा संभ्रम यामुळे ग्राहक सोने खरेदी करण्यास टाळाटाळ करीत असून सरकारने हि सक्ती शिथिल करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी करत सोमवारी सराफ्यातील दुकाने बंद करून त्यांचा निषेध नोंदवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!