Share

‘भाजप समोर महाविकास आघाडी भुईसपाट होईल’; चंद्रकांत पाटलांच भाकीत

Published On: 

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा ही चांगलीच वादळी ठरत आहे. महाविकास आघाडी सरकारसह शिवसेनेवर त्यांनी हल्लाबोल केलाय. मुंबईतून सुरु झालेली राणेंची जन आशीर्वाद यात्रा ही आता कोकणात पोहोचली आहे. सिंधुदुर्गात या यात्रेचे जलौषात स्वागत करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर हे देखील उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं. ‘जन आशीर्वाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीवर लोक खूश आहेत. पंढरपूर आणि साडे सहा हजार गावांमध्ये सत्ताधारी पराभूत झाले. आता यापुढे जिथे जिथे निवडणुका होतील, तिथे भुईसपाट होतील. या यात्रेतील प्रतिसादावरून दिसतंय’, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय.

राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका –

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीला घरी बसलेले आहेत. आता त्यांनी कायमचे मातोश्रीत बसावं’ असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. ‘हे सरकार आहे तरी कुठे, जनतेने या राज्यात भाजपचं सरकार यावं, मुंबई महापालिका आम्ही जिंकावी, मुंबई जगातील सुंदर, पर्यटन, आरोग्यदायी शहर बनवण्याची क्षमता फक्त भाजपमध्ये आहे, अशी जनतेची भावना आहे,’ असा दावा देखील राणेंनी केलाय. यासोबतच, ‘शिवसेनेचा आशिर्वाद आम्हाला नको, महागात पडेल, त्यांचा रोखीचा आशिर्वाद असतो,’ अशी खिल्ली देखील नारायण राणे यांनी उडवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!