Share

आता आश्वासन नव्हे तर वचनपूर्ती, आमदार अंबादास दानवेंनी व्यक्त केला विश्वास!

Published On: 

औरंगाबाद : शिवसेना ही नागरिकांच्या अडीअडचणीला धावून जाणारी संघटना आहे. दिलेला शब्द दिलेले आश्वासन, दिलेले वचन पाळणारी ही शिवसेना आहे. शहरात विविध विकास कामे पूर्णत्वास नेऊन नागरिकांना दिलेले आश्वासन, वचनपूर्ती शिवसेना करत आहे. असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते तथा जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी केले.

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या निधीतून शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. शिवसेनेने औरंगाबाद मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकासकामांचा धडाका लावला आहे. शहरातील प्रत्येक वॉर्डात अंबादास दानवे स्वतः विविध विकास कामांचे उद्घाटन करत फिरत आहेत. मात्र उद्घाटन हा फक्त एक बहाणा असून याद्वारे नागरिकांशी संपर्क साधून निवडणुकीची तयारी, तसेच निवडणुकांचा कल घेतला जात आहे.

शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे मंजूर झालेल्या औरंगाबाद पश्चिम शहरात वाॅर्ड क्रमांक ७३, विष्णुनगर प्रभागातील विष्णूनगर-अरिहंत नगर या मुख्य रस्त्याचे ८५ लाख रुपये खर्चून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे लोकार्पण रविवारी (दि.२२) आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख त्र्यंबक तुपे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विधानसभा संघटक सुशील खेडकर आदी नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!