Share

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल

Published On: 

औरंंगाबाद : नामांकीत लिवाईस कंपनीच्या नावाने बनावट मास्क आणि इतर साहित्याची विक्री करणाऱ्या चार दुकानदारांविरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात कॉपीराईट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री होत असल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बोरा (पानदरीबा), तुषार जैन (पानदरीबा रस्ता, शांतीनिकेतन धावणी मोहल्ला), गौतम बिहारीलाल नाथानी (विष्णूनगर), शेख इस्माईल शेख उमर (मंजूरपूरा) यांच्या दुकानातून नामांकित लिवाईस कंपनीच्या नावाने बनावट मास्क व इतर साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विनायक वळवईकर (रा. मालाड, ईस्ट मुंबई) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नामांकीत वंâपनीच्या नावाने बनावट मास्क विक्री करणाऱ्या दुकानदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!