मुंबई : अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने जमीन घोटाळा केल्याच्या आरोपामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याच मुद्यावरून सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या वतीने शिवसेना भवनावर ‘फटकार’ मोर्चा काढला होता. यावेळी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली.
भाजपने शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढून निषेध करणार होते. भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चेकरी जमा झाल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाच्या परिसरात गर्दी केली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली नंतर याच रुपांतर हाणामारीत झाले.
या सगळ्या प्रकरणावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा सज्जड दमच संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
दरम्यान, शिवसेना भवन महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. हुतात्मा चौक जसं आपल्या अस्मितेचं प्रतिक आहे. मराठी माणसाचं केंद्रबिंदू आहे. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण तसंच शिवसेना भवन मराठी माणसाच्या अस्मितेचं भवन आहे. ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचं कारण काय? तुम्हाला लिहिता वाचता येतं का? तुमचा शिक्षणाशी काही गंध आहे का? तुम्ही सामनाचा अग्रलेख नीट वाचा. जे आरोप झाले ते नीट वाचा. आमचे प्रवक्ते काय म्हणाले ते नीट ऐका. जे आरोप झाले आहेत, त्याची चौकशी करावी. ते आरोप द्वेष बुद्धिने केले असतील तर आरोप करणाऱ्यांना सोडू नका. त्यांच्यावर कारवाई करा, असं अग्रलेखात म्हटलं आहे. त्यावरून तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सिराज का इशांत ? ; सचिनने दिले ‘हे’ उत्तर
- ‘….तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावेच लागेल’
- रेकॉर्डवरील गुन्हेगार तरूणाची गळफास घेवून आत्महत्या
- पासपोर्ट प्रकरणी अमीर खानवर भडकली कंगना रनौत म्हणाली…
- १५० कोटींच्या सुपरस्पेशालिटीत एकही शस्त्रक्रिया नाही, खा.जलील यांचा खंडपीठात दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
