🕒 1 min read
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आज रात्री आणखी एक दणदणीत सामना अपेक्षित आहे. पुढील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केल्यानंतर विराट कोहली आज रात्री पहिला सामना खेळेल.
बंगळुरूचा संघ आज कोलकाता नाईट रायडर्सशी स्पर्धा करणार आहे. कोलकात्यासाठी उर्वरित सर्व सामने महत्त्वाचे आहेत. तर दुसरीकडे, बेंगळुरू संघ आपल्या कर्णधार कोहलीला आयपीएल जिकून विजयी भेट देऊ इच्छितो आहेत.
दरम्यान, विराटसाठी नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील हा सामना विशेष ठरणार आहे. कारण विराट कोहली 2008 पासून आरसीबीसाठी आयपीएलमध्ये खेळत आहे. आणि आता तो एकाच फ्रँचायझीसाठी टी-20 लीगमध्ये 200 वा सामना खेळणारा पहिलाच खेळाडू बनणार आहे.
आयपीएलमध्ये दोनशेपेक्षा जास्त सामने खेळण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 212 आयपीएल सामने खेळले आहेत. पण धोनी हे सामने चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स अशा दोन संघांसाठी खेळले आहेत.
या दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्याने एकूण 207 सामने खेळले आहेत पण डेक्कन चार्जर्स आणि मुंबई अशा दोन संघनसाठी त्याने 207 सामने खेळले आहते. कोहली सध्या या यादीत दिनेश कार्तिक आणि सुरेश रैना यांच्यानंतर पाचव्या स्थानावर आहे. पण, एकाच संघासाठी 200 आयपीएल सामने खेळणारा तो पहिलाच खेळाडू ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘जेव्हा तुमच्याकडे माही भाई असतो तेव्हा…’, धमाकेदार खेळीचे ऋतुराजने कर्णधाराला दिले श्रेय
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
- ‘अपेक्षेपेक्षा चांगल्या स्कोअरवर नेले’, माहीने ‘या’ दोन शिलेदारांना दिले विजयाचे श्रेय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
