नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, IPL 2021 च्या 30 व्या साखळी सामन्यात CSK विरुद्ध मैदानात उतरला नाही. रोहित शर्माला दुखापत झाली होती आणि यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. सीएसकेविरुद्ध रोहित शर्माच्या अनुपस्थितीत किरोन पोलार्डने संघाचे कर्णधारपद स्वीकारले. यूएई लीगच्या पहिल्याच सामन्यात, जेव्हा रोहित मुंबईसाठी मैदानावर आला नाही, तेव्हा क्रिकेट चाहते निराश झाले आणि हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण होत आहे की, तो कधी मैदानात उतरणार.
आता मुंबई इंडियन्स संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी रोहित शर्मा पुन्हा कधी मैदानात उतरणार हे सांगितले आहे. महेला जयवर्धनेच्या यांनी सांगितले की, ‘रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या पुढील सामन्यात पुन्हा खेळताना दिसेल. मुंबईचा संघ आता 23 सप्टेंबरला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आपला पुढील सामना खेळेल आणि तोपर्यंत रोहित तंदुरुस्त होऊन सामना खेळेल.’
रोहित शर्मा या लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे आणि त्याने त्याच्या टीमला आतापर्यंत पाच वेळा जेतेपद मिळवून दिले आहे. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने यूएईमध्ये विक्रमी पाचव्यांदा विजेतेपद पटकावले.
महत्वाच्या बातम्या:
- धोनी ब्रिगेड समोर टिकू शकला नाही पोलार्ड; मुंबईची यूएई लीगमध्ये खराब सुरुवात
- विराटचा मोठा निर्णय! आयपीएल 2021 नंतर सोडणार आरसीबीचेही कर्णधारपद
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी ; चेन्नईची मुंबईवर २० धावांनी मात
- UAE मध्ये मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड; आतापर्यंत एकदाही जिंकला नाही सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

