नवी दिल्ली : २९ जानेवारी पासून सुरु झालेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या कडून सकाळी ११ वाजता देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असणार आहे. कारण हा अर्थसंकल्प कोरोनामुळे मोडकळीस आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारणारा ठरणारा का याकडे सामान्यांसह सर्व देशाचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर यंदा देशाच्या इतिहासात पहिल्यांदच पेपरलेस बजेट सादर होणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाची प्रिंट छापण्यात आल्या नाही. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या प्रती सर्व खासदार, माध्यमे यांना दिल्या जातात. हि परंपरा यावर्षी खंडित होणार आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्पाआधी केले जाणारे सर्वेक्षण देखील छापले गेलेला नाही. तर सर्व अर्थसंकल्प हा डीजीटल सोफ्ट कॉपी मध्ये सादर केला जाणार आहे. दरवर्षी जवळपास १५ दिवस अर्थमंत्रालयाचे १०० कर्मचारी अत्यंत गोपनीय पद्धतीने अर्थमंत्रालयाच्या प्रेस मध्ये या प्रती तयार केल्या जातात.
यावेळी कोरोना काळात अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांना देखील दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. तर गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेची होत असलेली पडझड लक्षात घेता यंदाचा अर्थसंकल्प यावर काय उपाययोजना आणणारा ठरतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऋण समाधान योजने’ला मिळाली मुदतवाढ; १६ हजार शेतकरी कर्जमुक्त
- चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश पण…
- इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्र संघर्षाचे रक्तरंजित पडसाद भारतावर उमटणार नाही यासाठी खबरदारी घ्यावीच लागेल – सामना अग्रलेख
- आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात तर, बाद फेरी अहमदाबादेत
- बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

