मुंबई: शेतकरी आंदोलना दरम्यान झालेल्या दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर बॉम्बस्फोट झाला या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून खबरदारी घ्यावी लागणार असल्याच सांगण्यात आल आहे. ‘दिल्लीतील इस्रायली दूतावासाबाहेर शुक्रवारी झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. या हल्ल्यामागे ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन, त्यातील ट्रक्टर रॅलीदरम्यान 26 जानेवारी रोजी दिल्लीत झालेला गडबड-गोंधळ, पोलीस-आंदोलक यांच्यात झालेल्या चकमकी, पोलिसांवर झालेले हल्ले हे सगळे ताजे असतानाच हा बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे दिल्लीतील तणावात भरच पडली होती.
आता हे आंतरराष्ट्रीय कारस्थान असल्याचे उघड झाले आहे. ‘जैश-उल-हिंद’ या दहशतवादी संघटनेने हा स्फोट घडवून आणल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी जी चिठ्ठी सापडली आहे त्यामध्ये या संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमागे इराणचा हात असू शकतो असा संशय इस्रायलच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. या स्फोटाबाबत आपल्याला खूप आश्चर्य वाटलेले नाही असेही इस्रायलचे हिंदुस्थानातील राजदूत रॉन मल्का यांनी म्हटले आहे. या स्फोटाचा तपास इस्रायली गुप्तचर संस्था ‘मोसाद’ करणार आहे. म्हणजे हिंदुस्थानी तपास यंत्रणा आणि मोसाद असा होईल.
या तपासातून स्पह्टामागील नेमकी कारणे बाहेर येतीलच, पण हा स्फोट म्हणजे आपल्या गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनाही एक इशाराच म्हणावा लागेल. अरब राष्ट्रे आणि इस्रायल यांच्यातील शांती चर्चा, अरब देश आणि इराण यांच्यातील संघर्ष, इराण-इस्रायल वैमनस्य असे अनेक पदर या स्फोटाला आहेत. तपासाअंती त्यातील नेमके धागेदोरे उघड होतीलच, पण इराण, इस्रायल आणि अरब देश यांच्यातील संघर्षाचे पडसाद हिंदुस्थानी भूमीवर कशासाठी? हा प्रश्न उरतोच. हा स्फोट खूप तीव्रतेचा नव्हता आणि त्यात कोणीही जखमी झाले नाही. तथापि त्यासाठी दिल्लीसारख्या आधीच संवेदनशील झालेल्या देशाच्या राजधानीची निवड का करण्यात आली, हा मुद्दादेखील आहेच.
या स्फोटात ‘पीईटीएन’ या प्रकारची स्फोटके वापरण्यात आली असे आता उघड झाले आहे. ही स्फोटके लष्कराकडून वापरली जातात. ती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. तसेच घटनास्थळी जे बॅटरीचे अवशेष सापडले त्यांचा वापर इंडियन मुजाहिदीन आणि लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांकडून यापूर्वी झाला आहे. शुक्रवारच्या स्फोटात त्यांचा
अद्याप तरी आढळून आलेला नाही, उलट ज्या ‘जैश-उल-हिंद’ या संघटनेने दिल्लीतील स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे ती संघटनाही तशी अनोळखीच आहे. ‘हा तर फक्त ट्रेलर आहे’ असेही त्या संघटनेच्या चिठ्ठीत म्हटले आहे. म्हणजे ही संघटना खरंच अस्तित्वात आहे का, याचा शोध घेतानाच या संघटनेच्या आडून दुसऱयाच कोणाला दहशतवादी हल्ले घडवून आणायचे आहेत का, याचाही तपास करावा लागेल. देशातील सुरक्षा यंत्रणांना ‘हाय अॅलर्ट’वरच राहावे लागेल.
2012 मध्येही दिल्लीतील इस्रायली दूतावासातील अधिकाऱयाच्या पत्नीच्या मोटारीत स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळीही त्याचे इराणी कनेक्शन उघड झाले होते आणि इतरही देशांतील इस्रायली दूतावासांजवळ स्फोट घडविले गेले होते. आता दिल्लीच्या इस्राायली दूतावासासमोर स्फोट घडविण्यात आला तर पॅरिसमधील दूतावासाजवळ बॉम्ब सापडला. त्यामागील इराणी कनेक्शनही उघड होत आहे. म्हणजे 2012 मध्ये जे घडले तसेच काहीसे आता घडले. हा स्फोट कमी तीव्रतेचा होता हे खरेच, पण भविष्यात त्याचा ‘धमाका’ होणार नाही, इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्रे या त्रिकोणी संघर्षाचे रक्तरंजित पडसाद हिंदुस्थानी भूमीवर उमटणार नाहीत यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घ्यावीच लागेल.’ असा सल्ला यावेळी सामानातून देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकारचा फ्यूज उडालाय, जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही: चित्रा वाघ
- पक्ष कोणताही असो समाजाची बाजू मांडणार- आमदार सुरेश धस
- राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करावी ; दिल्ली काँग्रेस कमिटीने केला ठराव मंजूर
- औरंगाबाद मनपाला गांधी पुण्यतिथीचा विसर, काँग्रेसचे गांधीगिरी आंदोलन
- वीजबिल भरा अन्यथा कट होईल, शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी : अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

