बडोदा : कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरु झालेल्या. सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली आहे. बडोद्यावर ७ गड्यांनी मात करत तमिळनाडूने हे विजेतेपद मिळवले. तमिळनाडू संघाने हा सामना जिंकून दोनदा ही ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.
अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोद्याचा डाव १२० धावांवर आटोपला. तमिळनाडूचा युवा फिरकीपटू एम सिद्धार्थने आपल्या चार षटकांत २० धावा देऊन चार महत्वपूर्ण बळी मिळवले. बडोद्यासाठी विष्णू सोलंकीने सर्वाधिक ४९ धावा केल्या. ३६ धावांवर सहा गडी बाद झाल्यानंतर सोलंकी व अतीत सेठ यांनी सातव्या गड्यासाठी ५८ धावांची भागीदारी करत, बडोद्याला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
तमिळनाडूचे हे दुसरे सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी विजेतेपद आहे. यापूर्वी २००६-२००७ चा हंगामा तमिळनाडूमध्ये आपले पहिले विजेतेपद पटकावण्याची किमया केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी देखील दिनेश कार्तिक संघाचा कर्णधार होता. मागील वर्षी अंतिम फेरीत कर्नाटककडून पराभूत झाल्याने तमिळनाडू विजेतेपद पटकावून शकला नव्हता.
महत्वाच्या बातम्या
- पक्ष कोणताही असो समाजाची बाजू मांडणार- आमदार सुरेश धस
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने ‘महाराष्ट्रातचं’ होणार ?
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

