🕒 1 min read
मुंबई : आयपीएल स्पर्धेचे यंदाच्या मोसमातील साखळी फेरीचे सर्व सामने महाराष्ट्रत होणार असून बाद फेरीचे सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
आयपीएलच्या १४ व्या मोसमातील साखळी फेरीतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि मुंबईनजीकच्या स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. मुंबई आणि नजीकच्या परिसरात बरेच स्टेडियम असल्याने बीसीसीआयने मुंबईत साखळी सामने खेळवण्यास पसंती दिली आहे. मुंबईतील वानखेडे, बेब्रॉन स्टेडियम, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम तर पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे साखळी सामने खेळले जाणार आहेत अशी माहित टीओआय ने जारी केली आहे.
वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी. वाय. पाटील स्टेडियम, नवीन मुंबई येथील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम व पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील स्टेडियममध्ये आयपीएल सर्वाधिक सामने होणार असल्याचे सांगितले जात आहे. साखळी सामने यावेळी महाराष्ट्रामध्ये खेळवण्यात येणार आहेत. तसेच बाद फेरीतील सामने यावेळी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भरवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.
महत्वाच्या बातम्या
- पक्ष कोणताही असो समाजाची बाजू मांडणार- आमदार सुरेश धस
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने ‘महाराष्ट्रातचं’ होणार ?
- मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोर बैठकांना सुरुवात

