Share

‘ऋण समाधान योजने’ला मिळाली मुदतवाढ; १६ हजार शेतकरी कर्जमुक्त

Published On: 

नांदेड: कोरोना काळात शेतकऱ्यांना दिलासा देणारी स्टेट बँकेच्या ‘ऋण समाधान योजने’ला ३१ मार्च पर्यत मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी ३१ जानेवारी ही शेवटची तारीख होती. या योजनेचा लाभ नांदेडसह परभणी, हिंगोली, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांतील १६ हजार शेतकऱ्यांनी घेतला.

कोरोना संसर्ग काळात अनेक व्यवसाय आणि उद्दोगांना आर्थिक फटका बसला. त्याचा परिणाम अनेकांच्या रोजगारावर झाला. या काळात स्टेट बँकेच्या चेअरमननी नोव्हेंबर २०२० पासून कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसह व्यापारी व अन्य घटकांसाठी १० लाखांपर्यंत मुदतीत कर्ज घेतलेल्यांसाठी ‘ऋण समाधान योजना’ सुरू केली. यात थकीत रकमेच्या १०% रक्कम जमा करून घेण्यात येते. योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज माफ केले जात असून उचललेल्या कर्जातील मुद्दलपैकी १०% रक्कम बँकेत भरणा करून कर्जमुक्त होता येणार आहे. यासाठी कर्जाची रक्कम किमान दोन वर्षांपूर्वी थकीत असेल तर थकबाकीदार लाभास पात्र ठरणार आहे.

या योजनेत १६ हजार शेतकऱ्यांसह राजीव गांधी ग्राम निवारा योजनेतील ३९, शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या १५० लाभार्थींनी लाभ घेतला आहे. यापूर्वी भाजप सरकारने मुद्दल व व्याजाच्या रकमेसह दीड लाख रुपयांपर्यंतचे, तर विद्यमान सरकारने दोन लाखाची शेतीवरील कर्जाची माफी दिली होती. जवळपास ५० टक्के लाभार्थींनी योजनेचा लाभ घेतला आहे, असे आवाहन स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!