चेन्नई : कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन चेन्नई येथे होणाऱ्या पहिल्या दोन सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले आहे. यापूर्वी बीसीसीआय आणि तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनने प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबत चर्चा केली होती. मात्र या चर्चेअंती कसोटी मालिकेतील सामने बंद दाराआडच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता गृहमंत्रालयाने जरी केलेल्या नवीन दिशानिर्देशांनुसार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन दुसऱ्या सामन्यासाठी पन्नास टक्के प्रेक्षकांना प्रवेशाची अनुमती देण्याच्या विचारात आहेत. यासंदर्भात परवानगी देण्याची मागणीही त्यांनी बीसीसीआयकडे केली असल्याचे समजते. सोमवारी होणाऱ्या बीसीआयच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, चेपॉकच्या मैदानाची आसनक्षमता सुमारे ५०,००० प्रेक्षकांची असून पन्नास टक्के प्रेक्षकांना म्हणजेच २५,००० प्रेक्षकांना दुसऱ्या कसोटी सामन्याचा प्रत्यक्ष मैदानात जाऊन आनंद लुटता येईल. मात्र त्यासाठी बीसीसीआयच्या मंजुरीची वाट पहिली जाते आहे.
महत्वाच्या बातम्या
- पक्ष कोणताही असो समाजाची बाजू मांडणार- आमदार सुरेश धस
- नागरिकांच्या स्वप्नातील रस्त्यांचे डिझाइन प्रत्यक्षात उतरणार
- शिवाजी महाराज मूळचे कर्नाटकातील; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ यांनी तोडले अकलेचे तारे
- आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात तर, बाद फेरी अहमदाबादेत
- बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली


