Share

आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा दिवस राहणार!; नितेश राणेंचं भाकीत

Published On: 

रत्नागिरी : राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे.आज या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे.

यापैकी धुळे-नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीचा निकाल देखील लागला आहे. काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल विजयी झाले आहेत. पटेल यांची भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली होती. तर, उर्वीत जागांचं चित्र स्पष्ट होण्यास रात्र उजाडेल अशी परिस्थिती आहे.

भाजपच्या या पहिल्या विजयानंतर आमदार नितेश राणे यांनी भाजपच सर्व जागा जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे. ‘आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा दिवस राहणार आहे. हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं.याची सुरुवात अमरीश पटेल यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या सर्वच जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल’, असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!