Share

‘आज राज्य सरकारने मराठा आरक्षणाला संपवले, आरक्षणाचा सरळसरळ गेम झाला’

Published On: 

पुणे : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. मुंबई आणि राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज विविध मार्गाने आपला आक्रोश व्यक्त करत आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. ९ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत देखील मराठा आरक्षणावर स्थगिती कायम राहिल्याने तरुणांना भविष्याचा प्रश्न भेडसावत आहे.

अशातच, राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. SEBC उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार असल्याचं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.

मात्र, मराठा नेत्यांकडून राज्य सरकारवर अत्यंत गंभीर टीका केली जात आहे. ‘राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे (EWS) आरक्षण देऊन केवळ स्वत:ची सोय पाहिली आहे. आज राज्य सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे मराठा आरक्षणाला संपवले आहे.’ अशी जळजळीत टीका मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे.

‘मराठा समाजाला EWS प्रवर्गातंर्गत आरक्षण नको, ही बाब आम्ही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि राज्य सरकारसमोर स्पष्ट केली होती. मात्र, तरीही सरकारने हा निर्णय घेतला. राज्य सरकारने स्वत:च्या सोयीसाठी हा निर्णय घेतला. ही मराठा आरक्षणावर सरळसरळ झालेली गेम आहे,’ असं म्हणत तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!