मुंबई : ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या दुसऱ्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार अतिशय वेगाने होत असल्याचे त्यांच्या निष्कर्षावरून स्पष्ट होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांनी सावध राहतानाच चाचण्यांचे प्रमाण वाढवावे, मास्कचा वापर बंधनकारक करावा, पुढचा धोका लक्षात घेऊन जागरुक राहण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते सकाळी ६ अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात अनावश्यक रहदारी टाळावी, असे आवाहन करतानाच आंतरराष्ट्रीय प्रवास केलेले प्रवाशी देशांतर्गत प्रवास करुन महाराष्ट्रात येतात. विविध राज्यातून येणाऱ्या अशा प्रवाशांकडे लक्ष द्यावे. त्यांच्याबाबतीत जागरूकता ठेवावी. त्यासाठी दिल्लीसह इतर राज्यांशी, प्रशासनाशी समन्वय साधावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. कोरोनाच्या या नव्या रुपावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.
” ‘आऊट ऑफ कंट्रोल’ म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे, असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळे जगातील बहुतेक देशांनी ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत. नवीन वर्षात नवा कोरोना हे चित्र निराशाजनक आहे. यातून मार्ग काढावा लागेल. सगळ्यांचेच चेहरे काळजीने करपून गेलेले दिसतात. काय करावे? कसे करावे? उद्या काय होणार? हीच चिंता ज्याला त्याला लागून राहिली आहे. लोकांच्या सोशिकपणालाही मर्यादा आहेत हे मान्य, पण आज तरी आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.
सध्याचा काळ मोठा कठीण आला आहे, यात अजिबात शंका नाही. कोरोना नावाच्या एका विषाणूने जगभरात हाहाकार माजवून सोडला आहे. जीवनासंबंधी इतकी विवंचना आणि असुरक्षितता कधी कोणाला वाटली नसेल. हे सगळे कमी होते म्हणून की काय, आता कोरोनाच्या नव्या विषाणूने अवतार घेतला आहे. हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा भयंकर असल्याने आता कुठे सावरू लागलेले जग पुन्हा भयभीत झाले आहे. ए
केकाळी ग्रेट ब्रिटनने जगावर राज्य केले. ब्रिटिश साम्राज्याचा सूर्य कधीच मावळत नव्हता, असे गौरवाने बोलले जाते. त्याच ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा जहाल संसर्गजन्य असा नवा अवतार आढळून आल्यानंतर साऱ्या जगाने ब्रिटनवर जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे. ब्रिटनहून येणाऱ्या विमानांना बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनहून येणारा प्रत्येक प्रवासी क्वारंटाईन केला जाईल. ब्रिटनमधील विषाणूचा धसका असा की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई-ठाणे-पुणेसारख्या शहरांना मोठी आर्थिक झीज सोसावी लागेल, पण सावधगिरीचा उपाय म्हणून ही कठोर पावले उचलावीच लागणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला व रात्रीच्या संचारबंदीची गरज नसल्याचे सांगितले, पण ब्रिटनसारख्या देशातील भयंकर स्थिती पाहता महाराष्ट्राने सावधगिरीचा उपाय बाळगला आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेला विषाणू वेगाने पसरला आहे. त्यामुळे ब्रिटनसह अनेक युरोपियन देशांनी पुन्हा लॉक डाऊन सुरू केला. आजघडीस स्पेन, डेन्मार्क, नेदरलॅण्ड या देशांत चिंता वाटावी असे वातावरण आहे. इटलीमध्येही ब्रिटिश कोरोनाने शिरकाव केला आहे.
आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मते नव्या विषाणूला घाबरण्याची गरज नाही. देश सतर्क आहे. त्याचवेळी ब्रिटनचे आरोग्य सचिव मॅट हॅकॉक म्हणतात, नवा कोरोना व्हायरस पहिल्यापेक्षा जास्त खतरनाक असून तो वेगाने हल्ला चढवतो. त्याची संसर्ग क्षमता आधीच्या विषाणूपेक्षा 75 टक्के जास्त आहे. ही माहिती मन विषण्ण करणारी आहे. त्यामुळे हिंदुस्थानचे आरोग्यमंत्री काहीही म्हणत असले, तरी चिंता करावी लागेलच. हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात? ‘आऊट ऑफ कंट्रोल’ म्हणजे सुसाट सुटलेला हा विषाणू नियंत्रणाच्याही पलीकडे आहे, असे नव्या विषाणूचे वर्णन इंग्लंडच्या आरोग्य खात्याने केले आहे. त्यामुळे जगातील बहुतेक देशांनी ब्रिटनबरोबरचे हवाई संबंध तोडले आहेत.”
महत्वाच्या बातम्या
- ‘ती ताकद आता शिवसेनेत राहिलेली नाही, कारण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत’
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

