मुंबई:- भविष्यात आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचे आहे. महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर स्थानिक पातळीवर खटके उडत आहेत. पण आपल्याला शिवसेनेबरोबर जुळवून घ्यायचे आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर स्थानिक पातळीवर जमवून घ्या, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या अगोदर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष राज्यातील प्रमुख महानगर पालिकांसह महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या आजच्या विधानाला विशेष महत्त्व आहे.
दरम्यान, मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पक्षाचे मंत्री आणि वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर पाकिस्तानात फटाके फुटतील’
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- लसीकरणाच्या मोहिमेबाबत राजेश टोपेंनी केला महत्वाचा खुलासा!
- ‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’
- दोस्तीत कुस्ती : राष्ट्रवादीने पाडलं काँग्रेसलाच खिंडार!


