मध्य प्रदेश : केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकाविरुद्ध पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आक्रमक झाले असून गेल्या २८ दिवसांपासून दिल्लीच्या सीमारेषेवर त्यांचं आंदोनल सुरू आहे. दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच असल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडं या आंदोलनावरून राजकारण देखील चांगलंच तापलं आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सुमारे २१ जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीच्या दिशेने २१ डिसेंबर रोजी रवाना झाले आहेत. दुसऱ्या दिवशी चांदवड, मालेगाव, धुळे आणि शिरपूर येथे जनतेचा मोठा प्रतिसाद या आंदोलनास मिळाला. आज म्हणजेच तिसऱ्या दिवशी शेतकरी मध्य प्रदेशात दाखल झाले आहेत. मालेगाव व शिरपूर येथे मोठ्या संख्येने जनसभा घेण्यात आल्या.
गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या या जथ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याला सर्व गैर-भाजपा राजकीय पक्षांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबतच सपा, जद (एस), बसपा, आरपीआय, बीव्हीए आणि अर्थातच तीन डाव्या पक्ष – माकप, माकप, पीपीआय आणि पीडब्ल्यूपी यांचा देखील त्यात समावेश आहे.
हा मोर्चा आज 23 डिसेंबर रोजी सकाळी मध्य प्रदेशात दाखल झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात एनएपीएम आणि नर्मदा बचाओ आंदोलनाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सीमेवर उत्साहाने स्वागत केले. आज हा जत्था संपूर्ण दिवस मध्य प्रदेशातून पार करून रात्री राजस्थानच्या कोटाला पोहोचेल, अशी माहिती अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ती ताकद आता शिवसेनेत राहिलेली नाही, कारण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत’
- आज दुर्दैवाने देशाच्या शेतकऱ्याला त्याचे हक्क व मागण्यांसाठी आंदोलन करावे लागतेय : पवार
- कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गाफील राहून चालणार नाही : मुख्यमंत्री
- महापालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने काम करा, पक्ष सर्व मदत करेल : अस्लम शेख
- काँग्रेसमध्ये लवकरच आणखी भाजपा नेते प्रवेश करणार : बाळासाहेब थोरात


