हातकणंगले : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर राष्ट्रवादीमध्ये मेगा भरती सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांच्या पाठोपाठ भाजप नेते व माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी देखील राष्ट्रवादीची वाट धरली. तर, काही दिवसांपूर्वीच हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
सुमारे आठवड्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आवळेंचा पक्षप्रवेश पार पडला होता. माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे सदस्य अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते रामभाऊ सुर्यवंशी, कबनूरचे भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कुलकर्णी, भाजपाचे नितिन कामत, बाबू पतोरी, दिनेश डायमा, पिंपरी-चिंचवड येथील लहुजी सेनेचे युवराज दाखले, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी यांनी प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र धुसफूस निर्माण झाली आहे. ‘पक्षश्रेष्ठींनी विचार करावा अन्यथा आम्हाला दुसरा विचार करावा लागेल’ असा इशाराच हातकंगणले राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लखन बेनाडे यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील इनकमिंगवर स्थानिक नेते मात्र नाराज असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आपल्याला शिवसेनेबरोबर कायम राहायचंय त्यामुळे जुळवून घ्या; अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना
- शेतकरी आंदोलन : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मध्य प्रदेशात जोरदार स्वागत
- लसीकरणाच्या मोहिमेबाबत राजेश टोपेंनी केला महत्वाचा खुलासा!
- ‘हिंदुस्थानला पहिल्या कोरोनावर अद्याप नियंत्रण मिळविता आलेले नाही, तेथे दुसऱ्या कोरोनाचे काय घेऊन बसलात?’
- दोस्तीत कुस्ती : राष्ट्रवादीने पाडलं काँग्रेसलाच खिंडार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

