Share

तिढा सुटणार? मेट्रो कारशेडप्रकरणी शरद पवारांनी लक्ष घालावं; शिवसेना मंत्र्याची मागणी

Published On: 

मुंबई : पुन्हा एकदा मेट्रो कारशेडचा प्रश्न तापला आहे. फडणवीस सरकारच्या याकाळात आरेमध्ये कारशेड करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र पर्यावरणप्रेमींसह स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेता महाविकास आघाडी सरकारने कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय घेतला.

ही जमीन केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असून सद्या हा प्रश्न उच्च न्यायालयात गेला आहे. उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली असून या प्रकल्पाचा खर्च वाढत आहे. तर, दुसरीकडं मेट्रोच्या कामास देखील विलंब होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार व उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

या कारशेडचा गुंता दिवसेंदीव वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी नेते करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ आता शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पवारांनी मध्यस्थी करावी अशी इच्छा एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली आहे.

‘कांजूर मार्ग ची जागा राज्य सरकारची आहे हे कागदोपत्री सिद्ध झाले आहे. लाखो लोकांच्या हिताचा प्रकल्प आहे. कांजूरमार्ग येथे मेट्रो कारशेडचा निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे. यामध्ये 1 कोटीहून जास्त लोकांना फायदा झाला असता. केंद्र सरकारनेही सहाकार्य करायला पाहिजे. सध्या प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे अधीक बोलता येणार नाही’ अशी भूमिका एकनाथ शिंदेनी मांडली.

तर, ‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नेहमीच महाविकास आघाडीला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे या ही प्रकरणात ते लक्ष घालतील. शरद पवार ज्या ज्या वेळी असे प्रसंग येतात तेव्हा मार्गदर्शन करतात. पवार साहेबांनी पुढाकर घेतला तर यातून मार्ग निघू शकतो,’ असा विश्वास देखील शिंदेनी व्यक्त केला आहे.

पवार साहेब अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील – फडणवीस

‘हा विषय प्रतिष्ठेचा नसून जेव्हा शरद पवार उच्चाधिकार समितीचा अहवाल वाचतील तेव्हा ते सुद्धा आरेमधील जमिनीचा विचार करतील. ते व्यावहारिक बाजू बघतात. त्यामुळे पवार साहेब अहवाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेतील,’ असा विश्वास माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!