🕒 1 min read
मुंबई: आज मुंबई महापालिकेची मुदत संपणार असून निवडणूक न झाल्याने मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. मात्र यावरूनच भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“गरिब झोपडपट्टीवासियांचे SRA चे गाळे ढापणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व नाले सफाई कॉन्ट्राक्टरशी संगनमत करून शेकडो कोटीचे घोटाळे करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यापासून आज मुंबई करांची मुक्तता होणार.”, असे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
गरिब झोपडपट्टीवासियांचे SRA चे गाळे ढापणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर व नाले सफाई कॉन्ट्राक्टरशी संगनमत करून शेकडो कोटीचे घोटाळे करणारे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव पासून आज मुंबई करांची मुक्तता होणार!@BJP4Maharashtra pic.twitter.com/UzfSxgnR3U
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 7, 2022
दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचीच सत्ता येईल. तसेच मुंबईत आमचा भगवाच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पडलेल्या ईडीच्या धाडीवर त्या म्हणाल्या की, “यशवंत जाधव हे भीम सैनिक आहेत, भीम पुत्र आहेत. ते लढतील. जे सत्य आहे ते लवकरच सर्वांसमोर येईल. ही कायद्याची आणि कागदाची लढाई आहे.”
महत्वाच्या बातम्या:
-
“…तर अजित पवारांना फासावर लटकवणार का”, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
-
“वैराग्याच्या काळातही बगल में छुरी…”; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका
-
मुलाला मिळेना बॉलीवूडमध्ये काम; म्हणून ही मराठी अभिनेत्री आहे चिंतेत !
-
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, तर ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू
- “चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही”, ‘त्या’ घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
