Share

“…तर अजित पवारांना फासावर लटकवणार का”, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल

Published On: 

मुंबई: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आक्रमक झाल्याचे आज (७ मार्च) दिसून आले. विधानभवनात बोलताना त्यांनी आमदार रवी राणा तसेच अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीच्या घटनांवरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

“अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीची घटना घडली तेव्हा रवी राणा दिल्लीत होते. तरी पोलिसांनी रवी त्यांच्यावर कलम ३०७ आणि कलम ३५३ सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. ही घटना अत्यंत चूक आहे. पण गु्न्हेगाराशी संबंध नसताना शिक्षा दिली जात आहे. उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही केलं तर मग अजितदादांना (Ajit Pawar) फासावर देणार का?”, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

तसेच रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना कोणत्या नेत्यांचे फोन गेले? रवी राणा यांच्यावर ३०७ गुन्हा दाखल झाला. तर शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु असून याने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळायला हवं, अशी मागणीही फडणवीस यांनी विधानभवनात केली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!