Share

“वैराग्याच्या काळातही बगल में छुरी…”; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्यावरुन शरद पवारांनी फडणवीसांना टोले लगावले. तसंच राज्याचा कारभार फार उत्तम पद्धतीनं चालला असल्याचंही ते म्हणाले होते. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “शरद पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. एकीकडे ते आपल्या वयाच्या मानाची अपेक्षा ठेवतात पण वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री आला नाही.”

“एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. त्यांना पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे सन्माननीय शरद पवार हताशपणे बोलले असतील. आमच्या देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा राग यामुळेच आहे, की माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो,  यांना देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळे प्रस्थापितांचा तिळपापड होत आहे. म्हणून आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात.”

“मी शरद पवारांना सांगू इच्छीतो की, फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाचे  १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले होते. पण आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्धा फक्त ५४ आमदार निवडूण आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडूण दिले, अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीसवर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणं सोपं असतं पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणं कठीण असतं,” असा टोला पडळकर यांनी शरद पवारांना लगावला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!