🕒 1 min read
नवी दिल्ली : वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने आपला १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघात पहिला कसोटी सामना एंटीगुआमधील सर विवियन रिचर्ड्स स्टेडियम मंगळवार पासून खेळला जाईल.
एशेज मालिकेनंतर इंग्लंडचा हा पहिला कसोटी सामना असणार आहे. ही मालिका गमावल्यानंतर संघात खूप बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडचे दोन दिग्गज गोलंदाज जेम्स एंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना या सामन्यातून वगळण्यात आले आहे. तर रॉरी बर्न्स आणि हसीब हमीदच्या खराब फॉर्ममुळे या दोघांनाही या सामन्यात संधी देण्यात आली नाही. सपोर्ट स्टाफमध्येही मोठे बदल करण्यात आले आहेत.
डरहमचा फलंदाज एलेक्स लीस याला वरच्या फळीत संधी देण्यात आली आहे. तो या सामन्यातून आपले कसोटी पदार्पण करणार आहे. तर जॅक क्रॉलीला सलामी फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे. त्याने सराव सामन्यात पहिल्या डावात ६२ आणि दुसऱ्या डावात ३४ धावा केल्या होत्या.
तर ओली पोपच्या जागी डेन लॉरेंस याला संधी मिळाली आहे. त्याने सराव सामन्यात पहिल्या डावात ८३ व दुसऱ्या डावात ४८ धावा केल्या होत्या. तो चौथ्या नंबरवर फलंदाजी करेल. याव्यतिरिक्त अष्टपैलू बेन स्टोक्स, जॉनी बेयरेस्टो आणि बेन फोक्स यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
गोलंदाजीत इंग्लंडला मोठा झटका बसला आहे. जलदगती गोलंदाज ओली रॉबिन्सन दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. ख्रिस वोक्स, मार्क वुड आणि क्रेग ओवर्टन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. तर फिरकी गोलंदाज म्हणून जॅक लीचला संघात स्थान देण्यात आली आहे.
इंग्लंड चा संघ :
जो रूट(कर्णधार), जॅक क्रोली, बेन फोक्स, डेन लॉरेन्स, जॅक लीच, एलेक्स लीस, साकिब महम्मूद, क्रेग ओवर्टन, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, आणि, मार्क वुड
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
