Share

मृत वाघापेक्षा जखमी वाघ अधिक खतरनाक; ममतादीदींची डरकाळी

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत चांगलाच रंग चढला आहे. भाजपा आणि टीएमसी यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपने बंगाल जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल कॉंग्रेसचे नेते विजय आम्हीच मिळवू असं छातीठोकपणे सांगत आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या स्वत: नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढणार आहेत. १० मार्च रोजी नंदीग्राम मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारी ममता बॅनर्जी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, आणि याच मतदारसंघात ममता जखमी झाल्या होत्या.

सध्या त्यांच्यावर कोलकाताच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान नंदीग्राम विधानसभा मतदार संघ सर्वाधिक चर्चेत राहणार आहे. कारण, तृणमूलमधून भाजपात दाखल झालेल्या सुवेंदू अधिकारी विरुद्ध ममता बॅनर्जी असा थेट मुकाबला या मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.

नंदीग्रामच्या मैदानातून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डरकाळी फोडली आहे. ‘होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर आहे. मेलेल्या वाघापेक्षा जखमी वाघ नेहमीच खतरनाक असतो,’ अशा शब्दात ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले आहेत.

आज त्यांनी नंदीग्राममध्ये व्हीलचेअरवर बसून रोड शो केला. यावेळी त्यांनी भाजपलाच थेट ललकारले. ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी उभे आहेत. अधिकारी हे नंदीग्रामचे विद्यमान आमदार असून त्यांचे नंदीग्रामवर प्रचंड वर्चस्व आहे. त्यामुळे ही निवडणूक दोघांसाठी देखील अतिशय प्रतिष्ठेची बनलेली असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!