Share

आम्ही इटालियन जोडे उचलणार, पण तुम्ही दिल्लीकडे बघायचं नाही; भाजप नेत्याने राऊतांना झापलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारला विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून अडचणीत आणले आहे. सध्या राज्यात फोन टॅपिंग प्रकरणाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी अवैध रित्या फोन टॅपिंग करून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मदत केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. तसेच, फडणवीसांनी दिल्ली गाठून पोलीस दलातील बदल्यांबाबतचा फोन टॅपिंगचा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर केला आहे.

याच मुद्द्यावरून शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. ‘रश्मी शुक्ला प्रकरणात विरोधी पक्षनेते तोंडावर पडले आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांना भेटण्याची गरज नव्हती. त्यांनी त्यांची लढाई महाराष्ट्रातत ठेवायला हवी होती. त्यांनी वारंवार महाराष्ट्राची लक्ष्मणरेषा ओलांडू नये. काही गोष्टी घरातच राहायला हव्यात. जेव्हा वारंवार महाराष्ट्राचा नेता या मर्यादा ओलांडतो आणि दिल्लीकडे तोंड करून बघतो. सह्याद्री जेव्हा दिल्लीकडे बघतो, तेव्हा सह्याद्रीचं शिखर ओशाळल्यासारखं वाटतं.’ अशा खरमरीत शब्दांत त्यांनी फडणवीसांना सुनावलं आहे.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1376490925539532800?s=20

संजय राऊत यांच्या या टीकेला आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आम्ही इटालियन जोडे उचलणार, पण तुम्ही दिल्लीकडे बघायचं नाही असा राऊतांचा सूर आहे…,’ अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!