Share

लसीकरणाचा वेग वाढवा – जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

Published On: 

उस्मानाबाद: गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा कोरोना संसर्ग गतीने वाढत आहे. राज्यात तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये तर कोरोना थैमान घालत आहे. वाढत्या कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत, अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे तर अनेक जिल्हे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहेत. अशा परिस्थितीमध्ये लसीकरण मोहीम सुद्धा सर्वत्र सुरु आहे. पण आता ही लसीकरणाची गती वाढवण्याचे आदेश उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत टास्क फोर्सची बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड उपस्थित होते. फ्रंटलाईन कोरोना योध्यांपैकी ज्यांचे लसीकरण राहिले आहे, त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, असे आदेश या बैठकीदरम्यान देण्यात आले आहेत. ज्यांची कोरोना टेस्ट होणे गरजेचे आहे त्यांची माहिती घेऊन त्यांच्या तपासणीला आधी प्राधान्य देण्यात यावे, असेही दिवेगावकारांनी या वेळी सांगितले.

एक एप्रिल पासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. त्याची आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी देवेगावकर म्हणाले, ४५ वर्षांवरील पत्रकार, पोलीस, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी तसेच आदींना प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे आदेश या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!