Share

पीएम किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांची नोंदणी सुरु करा – किसान सभेची मागणी

Published On: 

सिल्लोड : पीएम सन्मान किसान योजनेच्या नवीन लाभार्थ्यांना या योजनाचा लाभ मिळावा यासाठी या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थींची महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या देशातील सर्वोत्कृष्ट कामाचा पुरस्कार या श्रेयवादावरून राज्यभर बंद पडलेली लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन ऑनलाईन नोंदणी पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या किसान सभेच्या वतीने सिल्लोडचे प्रभारी तहसीलदार संजय सोनवणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्रातील सरकारने गेल्या दोन वर्षांपासून देशातील आर्थिक कमकुवत शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा सामान्य आर्थिक कमकुवत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा या हेतूने केंद्र सरकारच्या माध्यमातून सदरील योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेत सहभागी होणाऱ्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना योजनेतील निकषांची पुर्तता करून महसूल विभागाकडे शेतकऱ्यांची संपूर्णपणे इत्यंभूत माहिती उपलब्ध राहत असल्याने या योजनेचा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी योजनेसाठी मागील वर्षांपर्यंत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे असलेल्या पोर्टलवरून लॉगिन करून माहिती भरण्यात येत होती.

महसूल विभाग व कृषी विभाग या योजनेत संयुक्तपणे काम करीत सेवा देत होते, परंतु या योजनेसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन नोंदणी कृषी विभाग व महसूल विभागाच्या श्रेयवादावरून बंद पडलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन नोंदणी तातडीने लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या किसान सभेने केली आहे.

या मागणीचे निवेदन सिल्लोड तहसीलचे प्रभारी तहसीलदार संजय सोनवणे यांना देऊन केली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची लाभार्थी शेतकऱ्यांची नवीन नोंदणी तातडीने सुरू न केल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान सभेने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!