मुंबई: राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (NCP leader Rohit Pawar) यांनी युक्रेनमध्ये रशियन हल्ल्यात आपला जीव गमावणाऱ्या नवीन शेखरप्पा या विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच देशात आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचा आरोपही त्यांनी ट्वीट करत केला आहे.
सध्याच्या परिस्थितीत आपल्याला रशियाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेंव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात आणि आपणच बरोबर आहोत असं त्या नेत्याला वाटतं तेंव्हा त्याला थांबवणंही अवघड असतं. मात्र लोकशाही टिकवणं हे लोकांच्याच हाती असतं आणि लोकशाही चिरडण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर लोकांनीच पुढं येऊन ती वाचवण्याची गरज आहे. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रशियाबाबत बोलायचं तर केवळ एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.. आणि इगोने भरलेल्या अशा व्यक्तीने एखादा खेळ सुरू केला आणि त्यात त्याचा पराभव होत असला तरीही माघार न घेण्याची त्याची प्रवृत्ती असते. यामुळं संपूर्ण जग आज वेठीस धरलं गेलंय.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 2, 2022
तसेच भारताबाबत विचार करताना आपल्याला संरक्षणावर खर्च करावाच लागेल पण आज महागाई आणि बेरोजगारीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं असताना मोठ्या प्रमाणात संरक्षणावर खर्च वळवणं आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही. अन्यथा देशात अनेक अडचणी वाढू शकतात. असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 2, 2022
“आज विकास सोडून सर्व प्रकारचं केवळ राजकारण होत असल्याचं दिसतं आणि याचा फटका सर्वसामान्य माणसाला सहन करावा लागतोय. त्यामुळं देशात सर्व राज्यांना विश्वासात घेऊन विकासाचा अजेंडा तयार करणं आणि कोणत्याही राज्याबाबत भेदभाव न करता तो राबवणं अधिक गरजेचं आहे.”, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
‘त्या’ घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मोदी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का?; राष्ट्रवादीचा सवाल
“राज्याबाहेर काही अघटित घडले की पवारांना कंठ फुटतो”, भातखळकरांचा टोला
खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर त्यांच्याच कार्यकर्त्यांचा कोट्यवधी फसवणूकीचा आरोप
“बाप-बेटा जेल जाणार सोबतच तीन सेन्ट्रल…”, संजय राऊतांनी पुन्हा केले ट्वीट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

