मुंबई : महाराष्ट्रात सध्या लॉकडाउनचे निर्बंध लागू असून हा लॉकडाऊन पुढचे किमान १५ दिवस तरी अजून वाढणार असल्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मात्र, त्यानंतर देखील राज्यात करोना रुग्णांची आकडेवारी खाली येताना दिसत नाहीये. पण आज दिवसभरात राज्यातल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधून आणि कोविड केंद्रांमधून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा ही राज्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब ठरली आहे.
#COVID19 | 985 deaths, 63,309 new cases reported in Maharashtra today; case tally reaches 44,73,394 pic.twitter.com/kw6TVcbqHt
— ANI (@ANI) April 28, 2021
आज राज्यात ६२ हजार ३०९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झालेय. तर ६१ हजार १८१ रुग्ण बरे होऊन घरी परतलेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३७ लाख ३० हजार ७२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ८३.४ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज सर्वाधिक ९८५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा आहे.
राज्यातील मृतांचा आकडा आज पुन्हा प्रशासनाची आणि सरकारची देखील चिंता वाढवणारा ठरला. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ९८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरात राज्यातील मृतांच्या आकड्यामध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. आजच्या संख्येनंतर राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता ६७ हजार २१४ इतका झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘रिपोर्ट निगेटिव्ह दाखवा मगच मतमोजणी केंद्रावर जा’, निवडणूक आयोगाचा आदेश
- योगी ‘राज’! आजोबांना ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट केल्याबद्दल युवकावर गुन्हा
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
- ‘बारामतीकरांकडून उजनीचे पाणी चोरण्याचा घाट’, खा.निंबाळकरांचा आरोप


