नवी दिल्ली : देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी, आसाम विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल येत्या दोन मे रोजी लागणार आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणूक आयागाने कडक निर्णय घेतले आहेत. देशात पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी मिरवणूक किंवा जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानंतर आयोगाने आणखीन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल किंवा लसीकरण पूर्ण झाल्याचा रिपोर्ट सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
Election Commission makes it mandatory for candidates and their agents to show negative RT-PCR test reports or complete vaccination reports to enter counting centres pic.twitter.com/RtMfAhgi76
— ANI (@ANI) April 28, 2021
मतमोजणी केंद्र पूर्णपणे सॅनिटाईझ करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याबरोबर मतमोजणी अधिकाऱ्यांची बैठकव्यवस्था अशी असावी की दोन अधिकाऱ्यांच्या मधे एक अधिकारी पीपीई कीट घातलेला असेल. त्याचबरोबर जिंकणाऱ्या उमेदवारास दोनपेक्षा जास्त व्यक्तींना सोबत आणायला परवानगी नाही. निवडणूक आयोग ही सर्वाधिक बेजबाबदार संस्था आहे, अशी टिप्पणी करत न्यायालयाने २ मे रोजीची मतमोजणी थांबवण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा मद्रास हायकोर्टाने आयोगाला दिला होता.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने दुसऱ्या लाटेसाठी निवडणूक आयोग जबाबदार असल्याचेही न्यायालयाने म्हटले होते. तसेच २ मे रोजीची मतमोजणी प्रक्रिया पुढे ढकलण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता. मद्रास उच्च न्यायालयात तामिळनाडूमधील करूर विधानसभा मतदार संघाबाबत ही याचिका होती. या एका जागेसाठी ७७ उमेदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महत्वाच्या बातम्या
- योगी ‘राज’! आजोबांना ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट केल्याबद्दल युवकावर गुन्हा
- ‘आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’
- ‘महात्मा फुले योजनेतंर्गत मोफत कोरोना उपचार देणे ही राज्याची जबाबदारी’, हायकोर्टाचे आदेश
- ‘बारामतीकरांकडून उजनीचे पाणी चोरण्याचा घाट’, खा.निंबाळकरांचा आरोप
- चक्क पोलीस अधिक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक खाते, मेसेजमधून मागितले पैसे!

