Share

योगी ‘राज’! आजोबांना ऑक्सिजनची गरज असल्याचे ट्विट केल्याबद्दल युवकावर गुन्हा

Published On: 

अमेठी :  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात एक वेगळी घटना घडली आहे. आपल्या आजोबांना ऑक्सिजनची गरज असून मदत करण्यासंदर्भातील मेसेज पोस्ट केल्याप्रकरणात उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय. या तरुणाने भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने खोटा मेसेज व्हायरल केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. शशांक यादव या तरुणाने, ‘माझ्या आजोबांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे’, असं ट्विट केलं होतं. यात  शशांकने त्याच्या आजोबांना कोरोनाची लागण झालीय की नाही हे सांगितले नव्हतं. नंतर शशांकच्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मागील काही दिवसांपासून अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून नातेवाईकांना ऑक्सिजन हवा असल्याची मागणी केल्याचे पाहायला मिळाले. अशाचप्रकारे शशांकनेही त्याच्या आजोबांसाठी ऑक्सिजनची गरज असल्याचं ट्विट सोमवारी केले होते.

https://twitter.com/shashankdy999/status/1386683781956870145

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत समाजमाध्यमावर समाजात भय निर्माण होईल अशा पोस्ट अपलोड करणं हे निंदनीय असून एक गुन्हा देखील आहे. अमेठीचे पोलीस अधीक्षक दिनेश सिंह यांनी याप्रकरणी पोलिसांची बाजू मांडणारा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. पोलीस अधीक्षक दिनेश सिंह यांनी शशांक यादव याच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत बोलताना सांगितलं की पोलीस जेव्हा आजोबांच्या घरी पोहोचले तेव्हा शशांक घरात झोपलेला होता. त्याने सनसनाटी पसरवण्यासाठी हे ट्विट केले होते असे दिसून येतंय असंही पोलिसांचं म्हणणं आहे.

शशांकने आपल्या ट्विटमध्ये अभिनेता सोनू सुदला टॅग केलं होतं. शशांकचा मित्र असणाऱ्या अंकितने हा मेसेज सोशल नेटवर्किंगवर शेअर करत पत्रकार असणाऱ्या अरफा खानुम शेरवानी यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी हा मेसेज ट्विट करत ऑक्सिजनची गरज असल्याचे म्हटले. अरफा यांनी अमेठीच्या खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनाही टॅग केलं होतं. मात्र या मेसेजमध्येही शशांकच्या आजोबांना कोरोनाची लागण झाल्याचा काही उल्लेख नव्हता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!