माढा : बारामतीकरांनी उजनी धरणाचे पाणी पळवण्याचा घाट घातल्याचा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हृदयस्थानी असतील तर मग इंदापूरला जाणारे पाच टीएमसी पाणी करमाळ्याचे आमदार संजय शिंदेंनी थांबवावे, असा चिमटा देखील खासदारांनी आमदार संजय शिंदे यांना काढला. करमाळ्यात संजय शिंदे यांनी अजित पवार घराणं माझ्या हृदयात आहे, मात्र उजनीचे पाणी पळवू देणार नाही, असे म्हटले होते. त्याला अनुसरून निंबाळकरांनी आपले मत व्यक्त केले.
पालकमंत्री दत्ता भरणे यांनी इंदापूरला पाच टीएमसी पाणी नेल्याचा जो विषय आहे. त्या विषयाचा संपूर्ण प्रस्ताव मी वाचला आहे. स्थिरीकरणाच्या नावावर बारामती लोकसभेचे स्थिरीकरण करण्याचा हा नवीन घाट घातलेला आहे. सोलापूर व सातारा या दोन्ही लोकसभा मतदार संघावर बारामतीकरांनी अशाच प्रकारे नीरा-देवधर आणि उजनी या दोन्ही ठिकाणाहून पाणी चोरीचा घाट घातला आहे.
‘सरकार सगळ्यांनी आणायचे आणि फक्त राज्य बारामतीसाठी करायचे’ अशा प्रकारचा प्रयोग सध्या महाराष्ट्रात दिसतोय. लवकर हे सरकार आणि राज्य उलथून पडेल. सत्ता बदलल्यानंतर हे चित्रदेखील बदललेले दाखवून देईन. पाणी चोरीच्या प्रकाराला माझा कायम विरोध राहणार अाहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष लढा उभा करणार असून प्रसंगी कोर्टातदेखील जाणार असल्याचे खा. निंबाळकर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- चक्क पोलीस अधिक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक खाते, मेसेजमधून मागितले पैसे!
- गैरप्रकार रोखण्यासाठी कोरोना रिपोर्टवर यापुढे ‘क्यूआर कोड’
- पालकमंत्री राजेंद्र शिंगणेंकडून रविंद्र तुपकरांची मागणी मान्य!
- ‘अगोदर लसीकरणाला अल्प प्रतिसाद, म्हणून मोदींनी विदेशात लस पाठवली’, खा.विखेंचा दावा
- याचिका दाखल झाल्यावर खा.सुजय विखे म्हणाले, ‘रेमडेसिवीरचा बाऊ करू नका’

