Share

राज्यात आज ३,६४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद तर ‘इतक्या’ रुग्णांचा मृत्यू

Published On: 

मुंबई : राज्यात आज ३,६४३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर आज ६,७९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,३८,७९४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.०५% एवढे झाले आहे.

तर राज्यात आज १०५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मतृयदूर २.११% एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,२४,४५,६८९ प्रयोगशाळा नमनुयाांपैकी ६४,२८,२९४ (१२.२६टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. तर सध्या सध्या राज्यात ३,०२,८८८ व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर २,४८७ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.

दरम्यान आता दहीहंडी साजरी केल्याने जास्त मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो असं टास्क फोर्सने सांगितले आहे. असे सांगून राज्य सरकारने यंदाच्या दहीहंडी लाल झेंडा दर्शवला आहे. एकंदरच कोरोना विषाणूचे संकट अद्याप टळले नसल्याने राज्यात दहीहंडी उत्सवाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दहीहंडी संघांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज्यात दहीहंडीला परवानगी नाकारण्यामागची कारणे देखील सांगितली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!