पुणे : पुणे शहरातील निर्बंध कमी करण्यात आले असले तरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे अधिक ठेवण्यास प्रशासन कटाक्षाने काम करत आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली असली तरी मागील महिनाभर पुण्यात सध्या १५० ते २०० हुन अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद केली जात आहे. आज पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या केवळ दोन आकडी नोंदवण्यात आली आहे.
पुणे शहरात आज नव्याने ९७ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ९१ हजार ९५९ इतकी झाली आहे. शहरातील २३३ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ८१ हजार १३३ झाली आहे.
शहरात आज एकाच दिवसात ५ हजार ७७८ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३० लाख ६८ हजार ०२१ इतकी झाली आहे. यासोबतच, शहरात उपचार घेणाऱ्या १ हजार ९३६ रुग्णांपैकी २०५ रुग्ण गंभीर तर २४५ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८९० इतकी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून आणखी आमंत्रण दिलं जातंय
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- अफगाणिस्तानवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
