Share

‘पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच’

Published On: 

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी परिसरात मुलभूत सोयी-सुविधेबरोबरच, पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते आदी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

रामनगर टोली येथे ग्रामीण भागातील मुलभूत सोयी-सुविधेअंतर्गत हनुमान मंदीर परिसराच्या आवारात सामाजिक सभागृहाचे भुमिपूजन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य प्रभाकर सेलोकर, स्मिता पारधी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प.स.सदस्य ज्ञानेश्वर कायरकर, सरपंच मंगला इरपाते, हेमराज तिडके, मंगला लोणबळे, सुनील आंबटकर, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.

रामनगर येथे 20 लक्ष रुपये खर्च करून सामाजिक सभागृह बांधण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, निधी मंजूर नसतांना केवळ नागरिकांना भूलथापा देण्यासाठी यापूर्वीच्या काळात तीन वेळा या सभागृहाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र आम्ही पहिले निधीची तरतूद केली. तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळविली आणि त्यानंतर भूमिपूजन केले. आता येथे लवकरच सभागृहाचे बांधकाम करून त्याचे लोकार्पण करण्यात येईल. जेणेकरून नागरिकांच्या सेवेत हे सामाजिक सभागृह उपयोगी पडेल. मेंडकी येथे 35 लक्ष रुपये खर्च करून मोठे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यात येईल. तसेच येथील नागरिकांची सब-स्टेशनची मागणी पूर्ण करण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

‘इको-टूरिझम’बाबत पालकमंत्री म्हणाले, ब्रम्हपूरी क्षेत्रात वाघांची संख्या ताडोबापेक्षा जास्त आहे. त्यामुळे ‘इको – टूरिझम’ विकसीत करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देऊ. पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच आहे. माणसाने वाघाला मारले तर मानवावर गुन्हा दाखल होतो. याबाबत कायदे कडक आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढून मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याबाबत वन विभागाला सुचना केल्या आहेत, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!