मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. आज सोमवारी दुपारी दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत बैठक घेण्यात आली. यानंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारण्यात आली. यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून, गोविंदांचे लसीकरण करून अटींसह दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती.
राज्य सरकारने परवानगी नाकारल्यानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. गुन्हे दाखल झाले तरी दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा निश्चय विरोधकांनी केला आहे. अटींसह दहीहंडीला परवानगी द्यायला हवी होती असं विरोधकांनी म्हटलं असलं तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहीहंडी समन्वय समिती आणि मंडळांना समजावल्यानंतर समन्वय समितीने देखील दहीहंडी साजरा न करण्याचे मान्य केले आहे.
कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील. सरकारला फक्त मराठी सणांमध्येच कोविड दिसतोय..@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mnsadhikrut @abpmajhatv
मराठी मनासाठी..मराठी सणासाठी..फक्त मनसे ..— avinash jadhav (@avinash_mns) August 23, 2021
दरम्यान, आता गुन्हे दाखल झाले तरी मनसे दहीहंडी मंडळांच्या मागे खंबीर उभी राहील, असा शब्द मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय. त्यामुळे दहीहंडीच्या आयोजनावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ‘कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठामपणे उभी राहील. सरकारला फक्त मराठी सणांमध्येच कोविड दिसतोय,’ असा टोला अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला लगावलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून आणखी आमंत्रण दिलं जातंय
- ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- पुणे जिंकणार, कोरोना हरणार! आज नव्या कोरोना बाधितांची संख्या केवळ दोन आकडी
- ‘पर्यावरणाच्या दृष्टीने वाघ महत्वाचा असला तरी मानवाचा जीवसुध्दा महत्वाचाच’


