कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा संताप व्यक्त करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांनी, मदतीचे असलेले निकष तात्काळ बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी केली.
आजच्या मोर्चात हजारो शेतकरी हे सामील झाले होते. दरम्यान, त्यांनी राज्य सरकारला टोकाचा इशारा देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. ‘पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. मदत मिळण्यासाठी मी ठाकरे यांच्याकडे गेलो होतो पण भेट दिली गेली नाही. अजूनही मदत मिळाली नाही. पूरानं शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यांनी पोराबाळांच्या शाळा, कॉलेजची फी कशी भरायची ?’ असा सवाल करत शेट्टी यांनी संताप व्यक्त केलाय.
पुढे ते म्हणाले, ‘महापुराचं एक कारण अलमट्टी धरणही आहे. तज्ज्ञ कितीही नाही म्हणत असले तरी आम्ही सिद्ध करायला तयार आहोत. लोकांची फसवणूक करण्यापेक्षा आम्ही सांगतो त्या पद्धतीनं व्यवहारिक उपाय करा. पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही?’ असा सवाल देखील त्यांनी राज्यकर्त्यांना केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘कोरोनाची सुरुवात नमस्ते ट्रम्पने आणि आता जन आशीर्वाद यात्रा काढून आणखी आमंत्रण दिलं जातंय
- २०२२ दिल्ली निवडणुकांसाठी भाजपाचे दोन दिवसीय चिंतन शिबिर
- ‘दहीहंडीसाठी कोरोनाचा बाऊ कशाला? ; दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे उभी राहणार’
- श्रुती मराठेचा साडीमधील सुंदर लुक चाहत्यांच्या पसंतीस
- अफगाणिस्तानवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
