मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
या छाप्यानंतर अनिल देशमुख यांनी माध्यमांना प्रतीक्रिया दिली यावेळी ते म्हणाले कि, ‘आज ईडीचे काही अधिकारी चौकशीसाठी आले होते. त्यांना मी पूर्ण सहकार्य केलं आहे. पुढील काळातही सहकार्य करणार आहे. परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे खोटे आरोप केले होते. त्यांना त्यांच्या पदावरून हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले होते. त्यांची जी संशयास्पद भूमिका होती त्यामुळे आम्ही त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवलं होतं. त्यांना आरोप करायचे होते तर त्यांनी आयुक्त असतानाच आरोप करायला हवे होते’ अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या घरासमोर स्कॉर्पिओ आणि त्यामध्ये ज्या जिलेटिनच्या कांड्या सापडणे या प्रकरणात परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. म्हणूनच त्यांना पदावरून हटवलं गेलं. ज्यानंतर त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. सीबीआय आता चौकशी करतं आहे जनतेसमोर सत्य लवकरच येईल असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईतील १० बार मालकांनी अनिल देशमुख यांना तीन महिने चार कोटी रुपये दिल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं आहे. ईडीने देशमुखांच्या नागपूर, मुंबईसह चार ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. मुंबईमध्ये ईडीचे पथक अनिल देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या निवासस्थानी सुद्धा शोध घेत आहे. बार मालकांनी देशमुखांना रोख रक्कम दिली. ते पुरावे ईडीने मिळवले असून त्या आधारावर ही कारवाई सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ, त्यांचा अशा गोष्टी करण्यात लौकिक’
- अनिल देशमुखांना १० बार मालकांनी चार कोटी रुपये दिले ;EDची माहिती
- औरंगाबादेत शुक्रवारी तब्बल १७ हजार जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण!
- कौतुकास्पद! औरंगाबादकरांची ‘माझी स्मार्ट बस’ देशात पहिली
- यादीतील उमेदवारांची २०१८ पासून ‘प्रतिक्षा’ संपेना, आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा


